गेल्या अनेक दिवसांमध्ये मला अनेक लोक प्रश्न विचारात आहेत की मला आयटीमध्ये शिफ्ट व्हायचं आहे तर ते मला होता येईल का?
या प्रश्नाकडे आपण दोन प्रकारे बघूया एक तर ऑब्जेक्टिव्हली.
हो तुम्हाला आयटीमध्ये शिफ्ट व्हायचं असेल तर आयटीमध्ये शिफ्ट होता येईल.
पण दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे की आयटीमध्ये तुम्हाला का शिरायचं आहे?
तुम्हाला खरंच आयटी च्या आवड आहे? प्रोग्रामिंगच्या आवड आहे? सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ची आवड आहे?
का फक्त पेस्केल जास्त आहे म्हणून तुम्हाला आयटीमध्ये स्विच व्हायचा आहे याच गोष्टीचा विचार आता आपण या आर्टिकल मध्ये करूया
एक तर खर आहे की आयटीमध्ये भरपूर प्रमाणात जॉब अवेलेबल आहेत.
भले सध्या अनेक कंपन्यांमधून अनेक लोकांना काढून टाकण्यात येत असले तरी ज्या माणसाकडे स्किल आहे अशा माणसाला कधीच काढून टाकले जात नाही.
स्किल्सच्या खालच्या टोकाला जे आहेत की ज्यांच्यामध्ये फार कमी स्किल आहे किंवा त्यांचा काम AI करू शकते तर हे लोक रिप्लेस होऊ शकतात.
अशा लोकांचा जॉब जात आहे मात्र जर तुम्ही अपस्किल्ड असाल तर तुमचा जॉब जाणं तेवढं सोपं नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे भारतामध्ये इतक्या आयटी कंपनीत आहे की त्यांना या कंपनीमध्ये जॉब मिळूनच जातो.
खरं तर अशी परिस्थिती आहे की कंपन्यांना चांगले डेव्हलपर मिळत नाहीयेत त्यामुळे जर तुम्ही स्वतःला चांगल्या प्रकारे स्किल केले असेल तर तुम्ही नक्कीच एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पगाराचा जॉब मिळवू शकता.
भारतामध्ये सतत दुसऱ्या देशामधून आयटी चे प्रोजेक्ट येत असतात आणि बऱ्याच वेळा प्रोजेक्ट वाईज आपल्याकडे रिक्रुटमेंट होते की एखादा छोटा सहा महिन्याचा प्रोजेक्ट असतो.
मग त्यावेळी कंपनीला नवीन माणसांची गरज पडते.
अशावेळी छोट्या काळासाठी लोकांना हायर करतात यामध्येही लोकांना चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळतं कारण छोट्या काळासाठी तुम्हाला चांगला पगार मिळतो आणि त्यानंतर जर तुमचं काम चांगलं असेल तर अर्थातच तुम्हाला पुढचा प्रोजेक्ट वरती कंटिन्यू केले जाते.
किंवा रेकमेंडेशन तरी मिळतं दुसऱ्या कंपनीमध्ये जाण्याचा त्यामुळे आपल्याकडे कायम रिक्वायरमेंट असते
भारताचे आयटी मार्केट हे वाढते आहे.
इथे अनेक कंपन्या फक्त मोठ्या स्केल वरती नाहीतर छोट्या स्केल वरती छोट्या छोट्या गावांमध्ये निघत आहेत.
आज अनेक छोट्या गावांमध्ये सॉफ्टवेअर बनवणाऱ्या वेबसाईट बनवणाऱ्या कंपन्या उपलब्ध आहेत की जिथे तुम्ही जॉब करू शकता.
तुम्हाला जर जॉब करायचा नसेल तर मार्केट आपलं एवढ मोठं आहे की तुम्ही स्वतःचा बिझनेस पण चालू करू शकता.
पहिल्यापासूनच आयटी क्षेत्रामध्ये पे स्केल ही खूप जास्त आहे त्यामुळे अनेकांना आयटीमध्ये येण्याची इच्छा होते.
इतर सर्विस सेंटर मध्ये पाहिलं तर तेवढी सॅलरीची रेंज नाहीये जेवढी आयटीमध्ये मोठ्या प्रमाणात मिळते ते पण पहिल्यापासूनच.
आणि जसं तुम्ही स्वतःला स्किल करत जाता तस पगार तुमचा वाढतच जातो त्यामुळे अनेकांसाठी आयटी हे एक जॉब करण्यासाठीचे क्षेत्र बनू शकते
पण एका इंडस्ट्री मधून दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये स्विच करणे एवढे सोपे आहे का?
जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असेल किंवा बॅक ऑफिसला काम करत असाल तर तिथून आयटीमध्ये सोपा आहे का?
तर अर्थात नाही ते का नाही हे आपण बघूया.
तर गोष्ट आहे की तुम्हाला खालपासून परत सुरुवात करावी लागते.
तुम्हाला बॅक ऑफिस चा पाच वर्षाचा अनुभव आहे म्हणून तुम्हाला प्रोग्राम म्हणून ज्यावेळी तुम्ही हायर व्हाल त्यावेळी तुमचा पाच वर्षाचा प्रोग्राम अनुभव पकडला जाणार नाही.
त्यावेळेस तुम्ही एक फ्रेशरच असाल त्यामुळे तुमची सॅलरी रेंज ही एका फ्रेशरची असेल म्हणून जर तुम्ही खालपासून परत सुरुवात करायला तयारी असेल तर नक्कीच तुम्ही आयटीमध्ये येण्याचा विचार करू शकता.
प्रोग्रामिंग मध्ये काम करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो गुण आहे तो म्हणजे तुमच्याकडे एनालिटिकल आणि लॉजिकल स्किल्स असल्या पाहिजेत.
अशा प्रकारे तुम्ही विचार केला पाहिजे कि एखादा जर तुम्हाला प्रॉब्लेम दिला तर तुम्ही तो अल्गोरिदम वापरून कसा सोडवू शकाल याचा विचार तुम्हाला करता येणं खूप महत्त्वाचं आहे.
आणि हा जर विचार तुम्ही शकत असाल तरच तुम्ही आयटीसी क्षेत्रामध्ये स्विच करणे तुम्हाला सोपं जाईल कारण आयटीमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हर्स ची खूप गरज आहे
आयटी ग्लॅमरस आहे असे प्रमोट केलं जातं.
मात्र तेवढं काही ते ग्लॅमरस नाहीये.
खूप जास्त तास काम करणं आणि खूप प्रेशर मध्ये काम करणं हे आयटीचे खूप दोन मोठे गुणधर्म किंवा वाईट गुण आहेत असं आपण म्हणू शकतो.
एखादं एप्लीकेशन जे लाईव्ह झालेला आहे आणि त्याच्यामध्ये जर आता काही एरर येत असेल तर रात्री उठूनही त्यात तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात दुसरी गोष्ट म्हणजे क्लाइंट डेडलाईन फार क्लिष्ट असतात त्यामुळे जसं सिनेमा दाखवला जाते एखाद्या हॅकर एखाद्या प्रोग्रामिंग वर काम करून दोन मिनिटात प्रश्न सोडवतो तसं नाही तसं तास एखादा प्रश्न सोडवत बसावा लागतो आणि पहाटे पहाटेपर्यंत तुम्हाला कदाचित काम करावं लागतं तर हा विचार जरूर करा तुम्ही तिथे दाखवलं जातं तसं नाहीये आयटी ही तेवढेच प्रेशर आहे.
तर मित्रांनो तुम्हाला खरंच आयटीमध्ये इंटरेस्ट असेल आणि तुम्हाला प्रोग्राम शिकण्यासाठी तो वेळ द्यायचा असेल आणि तुमच्यात अनालिटिकल आणि लॉजिकल अबिलिटी असेल आणि तुम्हाला परत पहिल्यापासून सुरुवात करण्याची जर इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही आयटीमध्ये स्विच करू शकता.
तुम्ही कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज शिकली पाहिजे हे पाहण्यासाठी तुम्ही खालील लिंकला क्लिक करून तुम्ही बघू शकता.