फुल स्टॅक वेब डेव्हलपर अशी व्यक्ती आहे जी क्लायंट आणि सर्व्हर सॉफ्टवेअर दोन्ही डेव्हलप करू शकते.
HTML आणि CSS वर प्रभुत्व मिळवण्याव्यतिरिक्त, त्याला फ्रंटएन्ड (जसे JavaScript, jQuery, Angular किंवा Vue वापरणे) आणि सर्व्हर साइड प्रोग्राम (बॅकएन्ड) दोन्ही (जसे की PHP, ASP, Python, Golang किंवा Node वापरणे) माहित असते.
भारतातील फुल-स्टॅक डेव्हलपरचा सरासरी पगार सुमारे 6 लाख प्रति वर्ष आहे. उत्तम अनुभव आणि कौशल्य असलेल्या व्यावसायिकांसाठी, ते 14 लाख प्रति वर् पर्यंत वाढू शकते.
Glassdoor नुसार, भारतात फुल स्टॅक डेव्हलपरच्या वेतनाची निम्न मर्यादा सुमारे 3.5 लाख प्रति इतकी आहे. तुम्ही बघू शकता, फुल-स्टॅक डेव्हलपर आकर्षक पगार मिळवतात.
त्यांना जास्त पगार मिळतो कारण ते कंपनीसाठी ऑपरेटिंग खर्च कमी करतात. ते एकट्या 2 किंवा 3 सरासरी प्रोग्रामरचे काम करू शकतात, ज्यामुळे कंपनीसाठी खूप पैसे वाचतात. आणि वेगवेगळ्या फ्रेमवर्क आणि तंत्रज्ञानासह काम करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे, त्यांना उच्च मागणी आहे.
फुल-स्टॅक डेव्हलपर म्हणून, तुम्हाला अनेक तंत्रज्ञानाची माहिती आहे. वेब पेजवर इमेज टाकणेे किंवा डेटाबेस तयार करणे असो, आपण त्या सर्वांशी परिचित असता.
हे तुम्हाला इतर डेव्हलपरच्या तुलनेत वरचढ बनवते कारण तुम्ही तांत्रिक निर्णय जलद घेऊ शकता आणि "बिग पिक्चर" पाहू शकता.
महत्वाची गोष्ट म्हणजे फुल स्टॅक मध्ये एकाच स्टॅक नसतो पण फुल स्टॅकचे अनेक स्टॅक आहेत. त्यातील काही महत्वाचे स्टॅक खालील प्रमाणे आहेत.
LAMP: JavaScript - Linux - Apache - MySQL - PHP
LEMP: JavaScript - Linux - Nginx - MySQL - PHP
MEAN: JavaScript - MongoDB - Express - AngularJS - Node.js
MERN: JavaScript - MongoDB - Express - React - Node.js
MEVN: JavaScript - MongoDB - Express - VueJS - Node.js
Python: JavaScript - Python - Django - MySQL/PostgreSQL
Ruby: JavaScript - Ruby - SQLite - Rails
मग आता हे सगळे शिकावे लागेल काय फुल स्टॅक डेव्हलपर होण्यासाठी?
नाही!
फुल स्टॅक डेव्हलपमेंट मध्ये जरी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी असल्या तरी त्या एका प्रकारात येतात.
त्या कुठल्या कुठल्या?
या मध्ये सर्वर आणि डेटाबेस मिळून बॅकेन्ड बनते.
इथे जर पहिले तर मी HTML, JavaScript आणि CSS लिहिले नाहीये. त्याचे कारण असे कि बाकी कुठल्या गोष्टी येवो किंवा या येवो पण या गोष्टी आल्याचं पाहिजे.
आता सर्व नवीन वेबसाईट मध्ये एक तरी जावास्क्रिप्ट फ्रेमवर्क वापरले जाते. मग यामध्ये तुम्ही खालील फ्रेमवर्क किंवा लायब्ररी शिकू शकता.
हे आणि असे अनेक फ्रंटएन्ड फ्रेमवर्क आणि लायब्ररी उपलब्ध आहेत.
यापैकी फक्त एक टेकनॉलॉजि घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता. सगळ्या जर एका वेळी शिकायला गेलात तर खूप अडचण निर्माण होईल.
सर्वर साईड प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये तुम्ही खालील भाषा शिकू शकता
आणि अशा बऱ्याच सर्वर साइड प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत. या पैकी कुठलीही एक भाषा घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता.
इथेही एक भाषा निवड आणि त्यामध्ये पारंगत बना. जर अनेक भाषा एका वेळी शिकायला गेलात तर खूप मोठी अडचण निर्माण होईल.
अनेक लोक आपल्याला सांगतात कि हि भाषा शिका ती शिका पण तुम्ही ठरवाल ती भाषा पूर्ण शिका. एकदा एक भाषा आली कि बाकीच्या शिकायला काही असचं येत नाही.
फुल स्टॅक डेव्हलपर मधला शेवटचा भाग आहे डेटाबेस. डेटाबेस मध्ये दोन प्रकार येतात ते म्हणजे
रिलेशनल डेटाबेस मध्ये खालील डेटाबेस येतात
आणि NoSQL डेटाबेस मध्ये खालील डेटाबेस येतात
आणि असे अनेक डेटाबेस येतात.
या पैकी कुठलाही डेटाबेस घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता.
आता सगळ्यात महत्वाचे आहे कि तुम्ही लवकरात लवकर या गोष्टी शिकायला चालू करा.
पण त्याआधी एक लक्षात घ्या कि HTML, CSS, आणि JavaScript आलच पाहिजे.
त्यामुळे कुठलीही दुसरी भाषा शिकण्याआधी या तीन गोष्टी येणं खूप गरजेचं आहे.आपल्या जावास्क्रिप्ट मास्टरी या कोर्स मध्ये या तिन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही या कोर्सला रजिस्टर करा आणि लवकरात लवकर या गोष्टी शिकायला चालू करा.