IT अपस्किलिंग साठी टॉप ५ साईट्स

आयटी क्षेत्रामध्ये कायम तुम्हाला अपस्किल करत राहावं लागतं.

तुमच्या स्किल्स मध्ये कायम भर करत राहावि लागते नाहीतर जे स्किल लेवलच्या खालच्या पायदानावर आहेत त्यांचा जॉब हा जात राहतो.  

मग जर अपस्किल करायचं असेल तर कुठल्या कुठल्या वेबसाईटवरून तुम्ही अपस्किल करू शकता स्वतःला याच्या टॉप ५ वेबसाईट ची यादी या आर्टिकल मध्ये दिली आहे.

Udemy 

जगातील सगळ्यात मोठी कोर्स असलेली साईट म्हणजे Udemy. Udemy वरती लाखोंमध्ये कोर्सेस अवेलेबल आहेत इथं जाऊन तुम्ही तुम्हाला पाहिजेल ती प्रोग्रामिंग लँग्वेज अगदी पटकन शिकू शकता.

आणि तेही कमी खर्चामध्ये आणि एखादा कोर्स जर तुम्हाला पटला नाही तर तुम्ही त्या प्रकारचे अनेक कोर्सेस या साइटवर उपलब्ध आहेत

ClickSkills 

दुसरा म्हणजे ClickSkills साइट वरती तुम्ही प्रोग्रामिंग लँग्वेजेस तुमच्या मातृभाषेमध्ये शिकू शकता.

जसे की आपल्याकडे आता मराठी मधून तुम्ही पायथन शिकू शकता, रिऍक्ट चा कोर्स आहे आणि असे अनेक कोर्सेस भारतीय भाषांमध्ये या साइटवर येत जातील दुसरे म्हणजे तुम्हाला डाऊट सोल्विंग साठी सपोर्टही दिला जातो.  

आपल्या डेडिकेटेड व्हाट्सअप नंबर आहे जिथे जाऊन तुम्ही तुमचा काय जो प्रश्न असेल तो तुम्ही विचारू शकता.

Skillshare 

तिसरा म्हणजे स्किलशेअर आहे.

इथे तुम्ही तुम्ही बारा महिन्याचे पॅकेज विकत घेऊ शकता.

आणि त्या बारा महिन्यांमध्ये तुम्ही कितीही कोर्सेस करू शकतात आणि कोर्सेस खूप लांबलचक नाहीये थोडक्यातले कोर्स आहेत.  

त्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट जर पटपट शिकायची असेल तर तुम्हाला स्किल शेअर वरती चांगलाच फायदा होऊ शकतो. 

Coursera 

अजून एक खूप फ्री एज्युकेशन चे सगळ्यात मोठे साईट म्हणजे कोर्सेरा वरती वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज ने कोर्सेस क्रिएट केलेले आहेत.  

आणि ते तुम्ही फ्री मध्ये करू शकता अर्थातच तुम्हाला सर्टिफिकेट हवा असेल तर तुम्हाला पे करावे लागतात.

पण नुसता कोर्स करण्यासाठी तुम्ही ते फ्री मध्येही करू शकता अनेक कोर्सेस अवेलेबल आहेत त्यातले तुम्ही फ्री मध्ये सगळे ट्राय करू शकता आणि स्वतःला करू शकता. 

Edx 

Edx हि अजून एक अपस्किलिंगची साईट आहे ह्याच्यावरती तुम्ही मशीन लर्निंग प्रोग्रामिंगच कोर्स करू शकतात.

तुम्हाला जर कोर्स बघायचा असेल तर तुम्ही फ्री मध्ये बघू शकता पण जर तुम्हाला सर्टिफिकेट हव असेल तर तुम्हाला मात्र पे करावं लागतं.

तर मित्रांनो तुम्ही कुठूनही अपस्किल स्वतःला करू शकता.

पण अपस्किल जरूर करा कारण अपस्किल केलं नाही तर जॉब जाण्याची खूप मोठी शक्यता असते आणि दुसरं म्हणजे नवीन नवीन शिकत राहण ही आयटी इंडस्ट्रीची गरज आहे ती तुम्हाला पूर्ण करावीच लागेल.

काय शिकावे कळत नाहीये?काळजी करू नका आम्ही तुम्हाला मदत करूमला मदत हवी आहे