तुम्ही जावास्क्रिप्ट मध्ये जर काम करत असाल तर तुम्हाला NPM म्हणजे नोड पॅकेज मॅनेजर हा शब्द अनेक वेळ कानावर पडला असेल.
तर नक्की आहे तरी काय npm?
नोड चा उदय होण्याआधी आपण आपलय वेबसाईट मध्ये वेगवेगळ्या जावास्क्रिप्ट ऍड करायचो स्क्रिप्ट (
या स्क्रिप्ट आपण का ऍड करायचो?
कारण फक्त एकच कि आपल्या वेबसाईट मध्ये वेगवेगळ्या फंक्शनॅलिटी ऍड करणे.
मग जर आपल्याला १० वेगवेगळ्या गोष्टी हव्या असतील तर १० वेगेवेगळ्या स्क्रिप्ट टाकाव्या लागायचा.
याचा एक तोटा असा होता कि तुम्हाला स्क्रिप्ट एका विशिष्ट क्रमाने टाकाव्या लागायच्या.
म्हणजे जर २ नंबर ची स्क्रिप्ट १ वर अवलंबून असेल तर आधी एक नंबर ची स्क्रिप्ट लोड झाली पाहिजे. जर उलट झाला तर आपली वेबसाइट चालायची नाही.
दुसरी गोष्ट म्हणजे आपण CDN द्वारे जर स्क्रिप्ट ऍड केली असेल आणि ते CDN जर बंद पडले तर साईट पण बंद पडेल.
हाच मुद्दा नोड आणि मोड्यूल्स ने सोडवला.
ECMA स्क्रिप्ट च्या नवीन स्टॅंडर्ड नुसार आपण जावास्क्रिप्टच्या वेगेवेगळ्या फाईल्स आपण विभक्त करून त्या इम्पोर्ट आणि एक्स्पोर्ट करू शकतो.
आणि लागतील तिथे वापरू शकतो.
नोड ने काय केले तर स्क्रिप्ट ऍड करण्या ऐवजी मोड्यूल वर भर दिला आणि या मोड्यूल साठी एक सेंट्रल स्टोरेज बनवलं.
आणि याच सेंट्रल स्टोरेज ला आपण npm असा म्हणतो.
पण npm हि एक कंपनी आहे बरं का!
npm Inc
npm, inc. 2014 मध्ये स्थापन केलेली कंपनी आहे.
2020 च्या मार्चमध्ये Github द्वारे या कंपनी ला टेक ओव्हर करण्यात आले.
हि एक for-profit कंपनी आहे. म्हणजे नफा कमावणे हा त्यांचा उद्देश आहे.
ते "npm" होस्ट करतात आणि देखरेख करतात (Node.js पॅकेज मॅनेजर).
npm मध्ये दोन भाग असतात: एक रेजिस्ट्री (पॅकेज होस्ट करण्यासाठी) आणि CLI (पॅकेजचा वापर आणि अपलोड करण्यासाठी).
या लेखनाच्या वेळी, npm नोंदणीमध्ये 800,000 पेक्षा जास्त पॅकेजेस 11 दशलक्ष JavaScript डेव्हलपर्सद्वारे दिवसातून 2 अब्ज वेळा इन्स्टॉल केल्या जात आहेत.
npm इन्स्टॉल कसे करावे?
ज्यावेळी तुम्ही Node.js तुमच्या कॉम्पुटर वर इन्स्टॉल करता त्यावेळी npm आपोआप इन्स्टॉल होते.
जर नोड आणि npm योग्यरित्या इन्स्टॉल केले असेल, तर तुम्ही कोणते version इन्स्टॉल केले आहे हे तपासण्यासाठी तुम्ही तुमच्या टर्मिनलमध्ये किंवा कमांड प्रॉम्प्ट मध्ये खालील कमांड रन करू शकता.
npm -v
पुढच्या भाग मध्ये आपण पॅकेजेस कसे इन्स्टॉल करायचे हे आपण बघूया.