कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज शिकली पाहिजे?

जगामध्ये सध्या अनेक प्रोग्रामिंग उपलब्ध आहेत पण यातील कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज शिकली पाहिजे?

कुठली लँग्वेज मला शिकण्यास सोपी पडेल?

कुठल्या मला जॉब मिळेल?

हे माहित करून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर या आर्टिकल मध्ये आपण तुम्ही कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज शिकली पाहिजे किंवा तुम्ही ती कशी सिलेक्ट केली पाहिजे हे आपण बघूया. 

Learning curve 

यामध्ये पहिला फॅक्टर आहे लर्निंग कर्व म्हणजे एखादी गोष्ट शिकण्यास किती वेळ लागेल.

जसं की तुम्हाला जर गिटार शिकायची असेल तर तुम्हाला अनेक वर्ष त्यामध्ये घालवावे लागतील म्हणजे हे तुम्ही काय महिन्याभरात दीड महिन्यात शिकण्यासारखे गोष्ट नाही.

तसेच प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजचा एक लर्निंग कर्व असतो.

काही प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्ही अगदी सात आठ दिवसात शिकू शकता.

तर काही शिकण्यासाठी कदाचित तुम्हाला महिना दोन महिने तीन महिने सहा महिने पण जाऊ शकतात.

तर यातली सगळ्यात कमी लर्निंग कर्व असलेली प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे पायथन.

कारण पायथन मध्ये सिंटेक्स अतिशय सोप्या स्वरूपात आणि आपण रेगुलर जसं बोलतो तसे इंग्लिश मध्ये लिहिलेलं असतं.

त्यामुळे अनेक लोकांना ज्यांना आयटीचा एक्सपिरीयन्स नाहीये किंवा प्रोग्राम याआधी केलेलं नाहीये त्यांना पायथन शिकणे खूप सोपे जाते. 

पण त्या उलट जर C# शिकायचं म्हटलं तर ती अवघड भाषा आहे ती शिकण्यासाठी तुम्हाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे कन्सेप्ट आणि काही मॉडर्न प्रोग्रामिंग चे कन्सेप्ट माहित असले पाहिजे जेणेकरून ती भाषा तुम्हाला शिकण्यास सोपे जाईल.

म्हणजे जर पायथन शिकण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा लागणार असतील तर तेच कदाचित आपल्याला शिकण्यासाठी जवळपास दीड ते दोन महिने घालवावे लागतील.

Syntax style 

दुसरा फॅक्टर आहे सिंटॅक्स स्टाईल म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज कशाप्रकारे लिहिली गेली आहे त्याचा सिंटॅक्स कशाप्रकारे आहे.

हा फॅक्टर खरंतर ज्यांनी ऑलरेडी एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज शिकले आहे त्यांच्यासाठी आहे.

म्हणजे जर मी सी प्रोग्राम शिकलो असेल तर मला पीएचपी शिकणे फार सोपे आहे कारण आहे किंवा जावा शिकणे सोपे आहे.

जावामध्ये पण आपण करली ब्रेसेस आणि सेमी कॉलमचा वापर करतो.

पण पायथॉनचे जर आपण सिंटॅक्स पाहिलं तर ते अतिशय वेगळ आहे. गोलँग तर फारच वेगळी आहे.

जनरली डेव्हलपर त्यांना जी भाषा माहिती आहे तशाप्रकाराची भाषा निवडतात त्यामुळे काय होतं लर्निंग कर कमी होतो.

Job opportunity 

आपल्याकडे शेकड्याने प्रोग्रामिंग लँग्वेजेस अवेलेबल आहेत पण प्रत्येक प्रोग्राम लँग्वेज मध्ये चांगले आणि चांगला पगार देणारे जॉब उपलब्ध नाहीयेत.

त्यामुळे आपल्याला अशी प्रोग्राम लँग्वेज शिकणं खूप गरजेचे आहे की जी शिकून आपल्याला काहीतरी जॉब मिळू शकेल.

स्किलचे रूपांतर पैशांमध्ये करू शकतो अशा प्रकारचा लँग्वेजेस आपण शिकल्या पाहिजेत.म्हणजे पायथन आहे, जावा स्क्रिप्ट आहे किंवा पीएचपी आहे पण तेच जर तुम्ही म्हणाल की मी तर Haskell प्रोग्रामिंग लँग्वेज शिकेन तर Haskell मध्ये तेवढे जॉब जॉब अवेलेबल नाहीयेत. 

Future 

आपण कुठलीही गोष्ट एखादी शिकतो त्यावेळी आपण बघतो की याचं फ्युचर काय आहे.

एखादी गोष्ट शिकण्यात काहीच अर्थ नाहीये की जी आता सहा महिन्यांनी बंद पडणारे किंवा तीन महिन्याने त्याचा फ्युचर नाहीये किंवा अगदी दोन वर्षांनी पण त्याच काही फ्युचर नाहीये.

त्यामुळे प्रोग्रॅम लँग्वेज सिलेक्ट करताना अशी निवडा की ज्याला पास्ट काहीतरी हिस्टरी आहे आणि ते फ्युचर मध्येही लोकांना लागणारच आहे किंवा त्याची जरी नवीन व्हर्जन निघाली तरी जुनं नॉलेज तुमचं बिन कामाचा होणार नाहीये त्यामुळे फ्युचर वर डोळा ठेवूनच तुम्ही प्रोग्रॅम लांग्वेज सिलेक्ट केली पाहिजे. 

Liking 

आणि आणि सगळ्यात शेवटचा आणि चौथा फॅक्टर म्हणजे आवड.

तुम्हाला एखादी भाषा शिकण्याची जर आवड निर्माण झाली की जसं मी Golang प्रोग्रामिंग लँग्वेज जी क्लिष्ट भाषा आहे पण ती शिकता शिकता जर तुम्हाला वाटले की नाही आपल्याला हि भाषा आवडली आहे तर तुम्ही ती कंटिन्यू करू शकता.  

मग त्यामध्ये लर्निंग कर्व किती जास्त असला तरी तुम्ही ती आरामात लँग्वेज शिकू शकता कारण तुम्हाला त्याच्याबद्दल आवड निर्माण झाली आहे.

तर मित्रांनो अशा प्रकारे वरील चार फॅक्टर वापरून तुम्ही कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज शिकली पाहिजे हे तुम्ही ठरवू शकता.

तुम्ही जर खालच्या लिंकला क्लिक केली तर तुम्हाला कळेल की कुठली टेक्नॉलॉजी तुम्ही खरच शिकली पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्या प्रकारचा जॉब उपलब्ध होईल.

काय शिकावे कळत नाहीये?काळजी करू नका आम्ही तुम्हाला मदत करूमला मदत हवी आहे