रिऍक्ट ही फेसबुकने बनवलेली एक टेक्नॉलॉजी आहे.
मुळात हे एक जावास्क्रिप्ट फ्रेमवर्क आहे आणि ते वापरवुन इतक्या वेबसाईट बनवल्या आहेत कि त्याची गणतीच करता येणार नाही.
त्यामुळे अर्थातच रिऍक्टसाठी प्रचंड जॉब मार्केट उपलब्ध आहे त्यामुळे अनेकांना वाटतं की आपण जर शिकलो तर आपल्याला चांगला जॉब मिळेल आणि ते खरंही आहे आज इतर टेक्नॉलॉजी पेक्षा रिऍक्ट डेव्हलपर ला मिळालेली सॅलरी ही नक्कीच जास्त आहे आणि एक्सपेरियन्सड डेव्हलपर्स ना तर भरपूरच सॅलरी मिळते.
गेल्या महिन्यांमध्ये रिऍक्टच 19 वा व्हर्जन रिलीज झालं म्हणजे तुम्ही बघू शकता की एक ते व्हर्जन 19 येण्यासाठी ती टेक्नॉलॉजी किती पॉप्युलर असेल आणि लोकांची त्यांना किती डिमांड असेल म्हणून आज 19 वर्जन त्याचं आलेलं आहे.
पण जर आपण रिऍक्ट डायरेक्टली शिकायला घेतलं तर त्याच्यामध्ये काहीतरी अडचणी येऊ शकतात मुळात रिऍक्ट शिकण्यासाठी काही गोष्टी आधी माहीत असणं गरजेचं आहे त्यातल्या काही गोष्टी आज आपण बघूया.
तर पहिली गोष्ट आहे रिऍक्ट जावास्क्रिप फ्रेमवर्क असल्यामुळे तुम्हाला जावास्क्रिप्टच ज्ञान असणं अतिशय महत्त्वाचं आहे जर तुम्हाला जावास्क्रिप्ट माहीत नसेल आणि जर तुम्ही डायरेक्टली शिकायला घेतलं तर असंही होऊ शकतं की कन्सेप्ट माहित नसल्यामुळे तुम्हाला रिऍक्ट खूप अवघड वाटू शकता पण ते तसं नाहीये म्हणूनच आधी जावास्क्रिप्ट शिकून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे
बर नुसतं जावस्क्रिप शिकूनही फायदा नाहीये. जावास्क्रिपचे नवीन जे कन्सेप्ट्स आहेत जसे की ई एस सिक्स, जसं की arrow फंक्शन्स, अरे डिस्ट्रक्चरिंग, ऑब्जेक्ट डिस्ट्रक्चरिंग या गोष्टी तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात काय मुळात मॉडर्न जावास्क्रिप्ट माहित असणं गरजेचं आहे
मग एकदा तुम्हाला जावास्क्रिप्ट माहित असेल तर तुम्हाला रिऍक्ट मध्ये प्रोग्रामिंग शिकणं अतिशय सोपं जाईल
बर दुसरा मुद्दा रियाक्ट मध्ये आपण काय लिहितो आपण कॉम्पोनंट्स तयार करतो आणि हे कॉम्पोनन्ट्स साठी आपल्याला एचटीएमएल माहीत असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आपल्याला हे कॉम्पोनंट स्टाईल पण करावे लागतात त्यामुळे साहजिकच आपल्याला सीएसएस माहीत असणं ही गरजेचं आहे म्हणून रिऍक्ट चा डेव्हलपर बनायचं असेल तर जस जावास्क्रिप महत्त्वाचा आहे तसं एचटीएमएल आणि सीएसएस माहित असणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे
म्हणजे तुम्हाला वेब डेव्हलपमेंट चे बेसिक्स माहीत असणं थोडक्यात गरजेचं आहे एकदा तुम्हाला वेब डेव्हलपमेंट चे बेसिक्स कळाले की रिऍक्ट शिकणं हे खूप सोपं जातं.
बर हे झाले लँग्वेजेस म्हणजे एसटीएमएल सीएसएस जावा स्क्रिप्ट या तीन आपल्याला लँग्वेजेस तर माहित पाहिजेत आणि जावा स्टेट मध्ये आपल्याला मॉडर्न त्याचे कन्सेप्टही माहिती पाहिजेत पण याशिवाय तुम्हाला वेब डेव्हलपमेंटचे ही कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे.
जसं की गेट रिक्वेस्ट पोस्ट रिक्वेस्ट फॉर्म डेटा त्याशिवाय फेज लायब्ररी किंवा एक्सयॉस लायब्ररी माहीत असणं गरजेचं आहे.
एकदा तुम्हाला हा पाया तुमचा पक्का झाला की तुम्हाला रिऍक्ट शिकणं खूप सोपं जाईल
त्यामुळे रिएक शिकण्याची घाई करू नका तुम्हाला पहिल्यांदा बघा की बेसिक कन्सेप्ट माहित आहेत का नाही जर बेसिस कन्सेप्ट माहित नसतील तर आधी ते पक्के करून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही रिऍक्ट शिकायला चालू करा
अशाने तुमचे रिऍक्ट पण पक्के होईल आणि तुम्ही पटकन ते शिकाल आणि एक चांगले रिऍक्ट डेव्हलपर बनण्यासाठी तुम्ही तयार व्हाल
जर तुम्हाला जावास्क्रिप्ट शिकायचं असेल तर जावास्क्रिप्ट चा कोर्स आपल्या साइटवर अवेलेबल आहे त्याला क्लिक करून तुम्ही तो कोर्स विकत घेऊ शकता