रिऍक्ट काय आहे आणि ते शिकण्यासाठी काय करावे? 

रिऍक्ट ही फेसबुक ने बनवलेली एक जावास्क्रिप्ट लायब्ररी आहे. रिऍक्ट चा वापर प्रामुख्याने फ्रंटएन्ड बनवण्यासाठी होतो. आणि अर्थातच हे फ्रंटएन्ड अतिशय वेगवान बनते.

रिऍक्ट वापरूनच फेसबुक आणि इंस्टाग्राम सारखी अप्लिकेशन लिहिली गेली आहेत त्यामुळे तुम्ही रिऍक्टच्या प्रचंड ताकदीचा तुम्ही अंदाज घेऊ शकता.

रिऍक्टचा इतिहास

जॉर्डन वाल्के (फेसबुकचे सॉफ्टवेअर अभियंता) यांनी रिऍक्टची निर्मिती केली. त्यांच्यावर XHP, PHP, HTML या गोष्टींचा खूप प्रभाव होता.

त्यांनी प्रथमतः "फॅक्सजेएस" नावाने रिएक्टचा प्रारंभिक प्रोटोटाइप जारी केला होता.

रिऍक्ट प्रथम २०११ मध्ये फेसबुक च्या न्यूज फीडवर आणि नंतर २०१३ मध्ये इंस्टाग्राम वर वापरण्यात आले होते.

नंतर मात्र मे २०१३ मध्ये JSConf US येथ रिऍक्ट ओपन सोर्स करण्यात आले.  

ओपन सोअर्स केल्यापासून आजपर्यंत रिऍक्ट जगातील साधारण ३% वेबसाईटवर वापरण्यात आले आहे.

फक्त वेबसाईट साठी नाही तर आज रिऍक्ट मोबाईल ऍप बनवण्यासाठीपण वापरले जात आहे.

रिऍक्ट, Angular, व्यूजेएस मध्ये फरक काय आहे?  

जर तुम्ही वेब डेव्हलपमेंटबद्दल याआधी वाचले असेल तर तुम्ही रिऍक्ट, Angular, व्यूजेएस हे शब्द नक्कीच ऐकले असतील.

आणि बऱ्याच वेळा हे सगळे एका माळेचे मणी आहेत असा गैरसमज होतो. पण रिऍक्ट हि फक्त फ्रंटएन्ड लायब्ररी आहे. म्हणजे काय थोडक्यात तर रिऍक्ट मध्ये तुम्ही फक्त आणि फक्त फ्रंटएन्ड बनवू शकता.

पण Angular, व्यू हे फ्रेमवर्क आहेत. म्हणजेच काय तर त्यात बऱ्याच गोष्टी आधी पासून येतात जसे कि राऊंटिंग, टेम्प्लेटिंग आणि इतर काही गोष्टी.

पण रिऍक्ट मध्ये असे काहीच येत नाही. रिऍक्ट म्हणते तुम्हाला UI सोडून ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तुमच्या हिशोबाने करा.

कुठला राउटर वापरायचा, कुठली ऍडऑन लायब्ररी वापरायची, स्टेट कशी मॅनेज करायची हे तुम्ही ठरवा.

रिऍक्ट कुठल्याच बाबतीत तुम्हाला अडवत नाही.

अशा प्रकारची मोकळीक असल्यामुळे रिऍक्ट स्टार्टअप कंपनी मध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

त्या उलट Angular, व्यू मध्ये काही गोष्टी या ठराविक पद्धतीनेच कराव्या लागतात. यात चुकीचं आणि बरोबर असा काही नाहीये.

सांगण्याचा मुद्दा असा आहे कि रिऍक्ट आणि Angular ची तुलना चुकीची आहे. रिऍक्ट तुम्ही सॉलिड, प्रीऍक्ट किंवा स्वेल्ट या लायब्ररीबरोबर तुलना करू शकता पण Angular, किंवा व्यू बरोबर नाही.

रिऍक्ट मागचा फंडा काय आहे? 

वर्चुअल डॉम (Virtual DOM) हा रिऍक्टचा कणा आहे.

जेव्हा आपण जावास्क्रिप्ट द्वारे एखाद html एलिमेंट चेंज करतो त्यावेळी आपली संपूर्ण UI परत तयार होते. आणि जितक्या वेळा हे चेंजेस होतात तेवढ्या वेळेला ती याच प्रक्रियेतून जाते.

आणि आज काल तुम्हालाही माहिती आहे कि अप्लिकेशन रिअल टाईम झाले आहेत. स्क्रीन वरची माहिती दणादण बदलत असते.

मग अशा वेळी जर आपण संपूर्ण UI बदलत बसतो तर ते अप्लिकेशन कधीच चालणार नाही.

आणि हाच मुद्दा रिऍक्ट ने लक्षात घेऊन वर्चुअल डॉम वापरायला चालू केले.

वर्चुअल डॉम हि एक आपल्या नेहमीच्या DOM ची एक मेमरीमध्ये असणारी कॉपी आहे.

मग रिऍक्ट अप्लिकेशन काय करता तर जेव्हा जेव्हा डेटा चेंज होतो तेव्हा तेव्हा रिऍक्ट आधी वर्चुअल डॉम मध्ये असणाऱ्या डेटाबरोबर तुलना करते.

आणि जिथे बदल घडला आहे फक्त तिथे खऱ्या DOM मध्ये बदल करते.

याचा सगळ्यात जास्त फायदा काय होतो तर माझी अख्खी UI परत रेंडर होत नाही आणि फक्त बदललेला भाग अपडेट होतो. जेणेकरून माझे अप्लिकेशन फास्ट चालते.

रिऍक्ट शिकण्यासाठी काय काय माहित असणे गरजेचे आहे? 

रिऍक्ट ही एक जावास्क्रिप्ट वर आधारित लायब्ररी आहे. त्यामुळे अर्थातच जावास्क्रिप्टचे सखोल ज्ञान असणे अतिशय आवश्यक आहे.

अनेक वेळा विद्यार्थी जावास्क्रिप्ट माहित नसताना किंवा अतिशय जुजबी माहिती असताना रिऍक्ट शिकायला घेतात आणि मग खूप मोठी अडचण निर्माण होते.

बेसिक कन्सेप्ट माहित नसल्यामुळे रिऍक्ट शिकणे अवघड जाते आणि मग आपण रिऍक्टकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो.

यातून नुकसान आपले उगीचच होते. त्यापेक्षा जावास्क्रिप्टचे जर सखोल ज्ञान घेतले आणि मग रिऍक्ट शिकले तर मार्ग खूप मोकळा होतो.

जावास्क्रिप्ट मधील खालील गोष्टी माहित असणं अतिशय आवश्यक आहे. 

  1. ऍरो फंक्शन
  2. ऍरे डिस्ट्रक्चरिंग
  3. ऑब्जेक्ट डिस्ट्रक्चरिंग  
  4. टर्नरी सिंटॅक्स
  5. मॅप
  6. मोड्युल इम्पोर्ट आणि एक्स्पोर्ट
  7. फेच API
  8. असिन्क आणि अवेट

जर तुम्हाला जावास्क्रिप्ट बेसिक पासून शिकायचे असेल तर आपला जावास्क्रिप्टचा मराठी मधून कोर्स आहे. हा कोर्स तुम्हाला जावास्क्रिप्टची पूर्ण ओळख करून देईल आणि त्याशिवाय वर दिलेले ऍडव्हान्स कन्सेप्ट पण सांगेल.

जावास्क्रिप्ट मराठी कोर्सची फ्री ट्रायल घ्या

याव्यतिरिक्त अजून काही गोष्टी असणं गरजेचं आहे ते म्हणजे  

  1. कमांड लाईन वापरणे
  2. HTML
  3. CSS

रिऍक्ट ही एक ऍडव्हान्स टेकनॉलॉजि आहे आणि त्यासाठी वरील गोष्टी येणं अतिशय गरजेचं आहे. या गोष्टी माहित नसताना जर आपण रिऍक्ट शिकायला घेतला तर ते शक्य  नाही.

रिऍक्ट शिकणे का महत्वाचे आहे?  

रिऍक्ट ही एक अतिशय लोकप्रिय अशी टेकनॉलॉजि आहे त्यामुळे अर्थातच रिऍक्ट साठी अनेक जॉब मार्केट मध्ये उपलब्ध आहेत.

महत्वाचे म्हणजे एका सामान्य वेब डेव्हलपरच्या मानाने रिऍक्ट डेव्हलपरची सॅलरी जास्त आहे.

ग्लासडोअर च्या माहिती नुसार हा आकडा रु ४,९०,००० प्रति वर्ष या घरात आहे.

रिऍक्ट कुठे शिकता येईल? 

रिऍक्ट शिकण्यासाठी अनेक कोर्सेस मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. युडेमी पासून यूट्यूब विडिओ पर्यंत सगळीकडे कोर्स उपलब्ध आहेत.

पण जर तुम्हाला रिऍक्ट मराठी मध्ये शिकायचे असेल तर क्लिकस्कील्स वर आपला रिऍक्ट चा कोर्स मराठी मध्ये उपलब्ध आहे.

या कोर्समध्ये तुम्हाला रिऍक्टचे सर्व बेसिक कन्सेप्ट शिकवले आहेत जेणेकरून तुम्ही तुमचे रिऍक्ट वेब ऍप स्वतः तयार करू शकता.

आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही फ्री ट्रायल आधी घेऊ शकता. जर तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही पेड कोर्स घेऊ शकता.

फ्री ट्रायल घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा.

रिऍक्ट मराठी कोर्सची फ्री ट्रायल घ्या

काय शिकावे कळत नाहीये?काळजी करू नका आम्ही तुम्हाला मदत करूमला मदत हवी आहे